शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रेनमध्ये गर्भवती महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; जीव वाचवण्यासाठी पळालेल्या पीडितेला बाहेर फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 18:19 IST

तमिळनाडूमध्ये गर्भवती महिलेचा विनयभंग करून चालत्या ट्रेनमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Tamil Nadu Crime: तमिळनाडूमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. चार महिन्यांच्या गर्भवती महिलेचा विनयभंग करून तिला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिल्याची घटना तामिळनाडूतील कटपाडीजवळ घडली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने अत्याचाराला विरोध केल्याने आरोपीने तिला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिलं. दरम्यान, महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर एका महिलेच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील रहिवासी असलेली ३६ वर्षीय पीडित महिला तिच्या आईकडे जात होती. महिला कोईम्बतूर-तिरुपती इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करत असताना हा प्रकार घडला. पीडित महिलेकडे आरक्षित तिकीट नसतानाही ती आरक्षित डब्यात जाऊन बसली होती. यावेळी त्या डब्यात तिच्यासह आणखी सात महिला होत्या. ट्रेन १० वाजून १५ मिनिटांनी जोलारपेट्टई स्थानकात आली तेव्हा इतर सर्व महिला खाली उतरल्या. यामुळे पीडित महिला डब्यात एकटीच होती. 

ट्रेन स्थानकावरुन सुटत असतानाच २७ वर्षीय आरोपी हेमराज त्या डब्यात चढला. काही वेळ बसल्यानंतर हेमराज त्या महिलेजवळ गेला आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला आणि स्वत:ला वाचण्यासाठी ती टॉयलेटकडे धाव घेतली. पण आरोपीने तिचा पाठलाग करून तिला ट्रेनमधून ढकलले, ज्यामुळे पीडितेच्या हात आणि पायाला फ्रॅक्चर झाले. घटनास्थळावरून जाणाऱ्या लोकांनी त्याला ट्रेनमधून पडताना पाहिले आणि त्याला वेल्लोरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले.

पीडित महिलेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. तिचे हात-पाय तुटले आहेत. डोक्यालाही जखम आहे. उपचारासाठी तिला जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोलारपेट्टई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी हेमराजला अटक केली.

दरम्यान, चेन्नई येथील महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी हेमराजची नुकतीच जामिनावर सुटका करण्यात आल्याचे चौकशीदरम्यान समोर आलं. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २०२२ मध्ये गुंडा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस