तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली. दगड खाणीत झालेल्या मोठ्या भूस्खलनात चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दगडखाणीत अजूनही बचावकार्य सुरू आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील मल्लकोट्टई येथे एस.एस. कोट्टईजवळ मेगा ब्लू मेटलद्वारे चालवल्या जाणाऱ्या दगड खाणीत भूस्खलन झाले. या घटनेबाबत माहिती देताना शिवगंगा जिल्हा एसपी म्हणाले की, 'आतापर्यंत आम्हाला चार मृतदेह सापडले आहे आणि एका जखमी व्यक्तीला मदुराई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.