धक्कादायक! ब्रेड घशात अडकून बॉडी बिल्डरचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 06:24 PM2023-03-03T18:24:09+5:302023-03-03T18:24:55+5:30

चेन्नईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना ब्रेकमध्ये घशात ब्रेड अडकल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Tamil Nadu Horror Body Builder Chokes to Death After Bread Eaten During Workout Break Stuck in Throat | धक्कादायक! ब्रेड घशात अडकून बॉडी बिल्डरचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

धक्कादायक! ब्रेड घशात अडकून बॉडी बिल्डरचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

चेन्नई-  चेन्नईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना ब्रेकमध्ये घशात ब्रेड अडकल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यात ही घटना आहे. मृताचे नाव एम हरिहरन असे असून तो सेलममधील पेरिया कोल्लापट्टीचा रहिवासी आहे.

तो कुड्डालोर येथील वडालूर येथे राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रशिक्षण घेत होता. ७० किलो वजनी गटांतर्गत स्पर्धा करणारा हरिहरन शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी कुड्डालोर येथे थांबला होता. सर्व सहभागींना कुड्डालोर येथील एका लग्नमंडपात बसवण्यात आले. 

Rahul Gandhi Praises PM Modi : केंब्रिजमध्ये राहुल गांधीनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; 'या' दोन योजनांचा केला उल्लेख

घटना घडण्यापूर्वी हरिहरन सराव करत होता. वर्कआउट सत्रादरम्यान त्याने जेवण घेण्यासाठी ब्रेक घेतला. यावेळी त्याने खाल्लेल्या ब्रेडचा तुकडा त्याच्या घशात अडकला. यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हते, दरम्यान, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण यात त्याचा मृत्यू झाला. आणखी एका घटनेत हैदराबादमधील जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तरुणाच्या मृत्यूचे धक्कादायक क्षण जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. विशाल असे मृताचे नाव असून तो पुश-अप आणि स्ट्रेच करत असताना खाली कोसळला. अहवालानुसार, त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला.

Web Title: Tamil Nadu Horror Body Builder Chokes to Death After Bread Eaten During Workout Break Stuck in Throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.