तामिळनाडू विधानसभेचा बनला आखाडा सभागृहात तोडफोड : डीएमडीकेच्या आमदारांना बाहेर काढले
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:42+5:302015-02-20T01:10:42+5:30
चेन्नई : अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्याबद्दल विरोधी पक्षाचे उपनेते अझागापुरम मोहनराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर गुरुवारी तामिळनाडू विधानसभेचा आखाडा बनला. अभूतपूर्व गदारोळात देसिया मुरपोक्कू द्रविडा कझगमच्या (डीएमडीके) सदस्यांनी दस्तऐवज फेकले आणि विधानसभाध्यक्षांच्या कक्षाच्या काही भागाची नासधूस केली.

तामिळनाडू विधानसभेचा बनला आखाडा सभागृहात तोडफोड : डीएमडीकेच्या आमदारांना बाहेर काढले
च न्नई : अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्याबद्दल विरोधी पक्षाचे उपनेते अझागापुरम मोहनराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर गुरुवारी तामिळनाडू विधानसभेचा आखाडा बनला. अभूतपूर्व गदारोळात देसिया मुरपोक्कू द्रविडा कझगमच्या (डीएमडीके) सदस्यांनी दस्तऐवज फेकले आणि विधानसभाध्यक्षांच्या कक्षाच्या काही भागाची नासधूस केली.मोहनराज यांनी जयललिता यांच्या नावाचा उल्लेख न करता केलेल्या टिप्पणीवर अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह अण्णा द्रमुकच्या १५१ आमदारांनी एकमुखी मागणी रेटून धरली असता विधानसभाध्यक्षांनी मोहनराज यांचे विधान कामकाजातून वगळण्याचा आदेश दिला. मोहनराज यांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढण्याचा आदेश दिल्यानंतर अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले. डीएमडीकेचे सदस्य विधानसभाध्यक्षांच्या आसनासमोर धावले आणि त्यांनी आदेश रोखण्याची मागणी केली. या पक्षाचे प्रतोद व्ही.सी. चंद्रकुमार यांनी तर मार्शलला अडविण्याचा प्रयत्न केला. मार्शलनी डीएमडीकेच्या आमदारांना घेराव घालत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा या आमदारांनी जोरदार नारेबाजी करीत विधानसभाध्यक्षांची कृती पक्षपाती असल्याचा आरोप केला. डीएमडीकेच्या आमदारांनी विधानसभाध्यक्षाच्या कक्षाचा तोडलेला भाग समोर ढकलला आणि कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिली. दरम्यान या पक्षाच्या आमदारांचा मुद्दा हक्कभंग समितीकडे सोपविण्यात आला. सभागृहाबाहेर लॉनमध्ये आलेल्या आमदारांनी घोषणाबाजी चालूच ठेवली होती.---------------------------विधानसभेच्या इतिहासातील काळा दिवसहा विधानसभेच्या इतिहासातील अतिशय वाईट दिवस असल्याचा शेेरा विधानसभाध्यक्षांनी मारला. आमदारांनी माझ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या कक्षाची तोडफोड केली. कागदपत्रे फाडून टाकली. सभागृहाने हे बघितले आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. या आमदारांवर कोणती कारवाई करावी याबाबत मी सभागृहाच्या नेत्यांशी चर्चा करेन, असे ते म्हणाले.----------------------हल्ला जीवघेणाचंद्रकुमार यांनी विधानसभाध्यक्षांवर केलेला हल्ला जीवघेणा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाथम विश्वनाथन यांनी केला. चंद्रकुमार आणि डीएमडीकेच्या अन्य आमदारांना उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला. सभागृहाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न हे पाशवी कृत्य असून मोठा कलंक आहे. कागदपत्रे फेकण्यात आली. मार्शलची कॅप हिसकावण्यात आली. हा मोठा गुन्हा आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर हा प्रस्ताव सभागृहाने पारित केला.