शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:05 IST

Tamil Nadu Assembly Election 2026: यावेळच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये एक अजब बाब दिसून आली आहे. ती म्हणजे यावेळी तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमके आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमकेसह एकाही प्रमुख पक्षाने एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. 

तामिळनाडू विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. राज्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीत सत्ताधारी डीएमकेच्या नेतृत्वातील आघाडी आणि एआयएडीएमके पक्षाच्या नेतृत्वाखालील प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी यांच्यात मुख्य लढत होत आहे. तर अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने यावेळी तामिळनाडूमधील विधानसभेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये एक अजब बाब दिसून आली आहे. ती म्हणजे यावेळी तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमके आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमकेसह एकाही प्रमुख पक्षाने एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत समोर येत असलेल्या माहितीनुसार गेल्या ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यातील एकाही प्रमुख पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. ब्राह्मण व्यक्तींना उमेदवारी न देणाऱ्या पक्षांमध्ये सत्ताधारी डीएमके, डीएमकेचा मित्रपक्ष काँग्रेस, मुख्य विरोधी पक्ष असलेला एआयएडीएमके आणि भाजपाचा समावेश आहे. मात्र पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या विजय याच्या पक्षाने दोन ब्राह्मण व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. तर इतर काही छोट्या पक्षांनीही काही ब्राह्मण व्यक्तींनी उमेदवारी दिली आहे.

तामिळनाडूमध्ये एकाही प्रमुख राजकीय पक्षाने ब्राह्मण व्यक्तींना उमेदवारी न देण्यामागे काही राजकीय आणि सामाजित कारणं असल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये ब्राह्मण समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३ टक्के एवढी आहे. त्यामुळे येथील राजकीय पक्षांची समीकरणे ही राजकीय दृष्ट्या प्रभावी आणि लोकसंख्येच्या दृष्टीने व्यापक असलेल्या समाजांच्या आसपास फिरत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे एकेकाळी ब्राह्मण समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनाधार असलेल्या एआयएडीएमके पक्षानेही एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. त्याशिवाय तामिळनाडून एआयएडीएमकेसोबत युती करून केवळ २७ जागांवर लढत असलेल्या भाजपानेही एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही.

एआयएडीएमके पक्षाने २०२१ च्या विधानसभा निवडणुकीवेळी एआयएडीएमके पक्षाने माजी पोलीस महासंचालक आर. नटराज यांच्या रूपात एकमेव ब्राह्मण चेहऱ्याला उमेदवारी दिली होती. मात्र यावेळी एआयएडीएमकेने एकाही ब्राह्मण व्यक्तीला निवडणूक लढण्याची संधी दिलेली नाही. तामिळानाडूमधील ब्राह्मण समाज हा भाजपाकडे वळत असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाही भाजपाने एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवारी जाहीर केलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu Elections: No Major Party Fields Brahmin Candidate

Web Summary : Tamil Nadu's upcoming election sees no major party fielding Brahmin candidates, a first in 35 years. DMK, AIADMK, and BJP overlook the community, which comprises only 3% of the population. Actor Vijay's party has nominated two Brahmin candidates.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक 2026Dravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमBJPभाजपाcongressकाँग्रेस