शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत स्टॅलिन यांच्यासह ३४ मंत्र्यांचा शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 05:27 IST

पुदुच्चेरीत एन. रंगासामी यांनी घेतली शपथ 

चेन्नई : विधानसभा निवडणुकीत द्रमुकला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर पक्षाध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी तामिळनाडूचेमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी ६८ वर्षीय स्टॅलिन यांना राजभवनात आयोजित साध्या समारंभात पद व गोपनीयतेची शपथ दिली. स्टॅलिन यांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत एकूण ३४ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात १५ जण प्रथमच मंत्री झाले आहेत. या सर्व मंत्र्यांनी तामिळमधून शपथ घेतली. द्रमुकचे दिग्गज नेते आणि महासचिव दुराईमुरुगन यांना स्टॅलिन यांच्यानंतर शपथ देण्यात आली. त्यांच्याकडे जल संसाधन हे खाते देण्यात आले आहे. 

गृहखात्यासह सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन आदी खाती स्टॅलिन यांच्याकडे असणार आहेत. पलानीवेल त्यागराजन यांच्याकडे वित्त व मानव संसाधन ही खाती असणार आहेत. सुब्रमण्यन यांच्याकडे आरोग्य खाते दिले आहे. कृषी व पर्यावरणासह अनेक विभागांची नावे बदलण्यात आली आहेत. कृषी विभाग आता कृषक कल्याण विभाग, तर पर्यावरणऐवजी पर्यावरण व जलवायू परिवर्तन विभाग असेल. एमआरके पनीरसेल्वम कृषी व कृषक कल्याण मंत्री असतील. एस. मस्तान हे अल्पसंख्यांक मंत्री असतील. या कार्यक्रमास स्टॅलिन यांच्या पत्नी दुर्गा आणि आमदार व त्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांची उपस्थिती होती.  विरोधी पक्ष अण्णाद्रमुकचे नेते ओ पनीरसेल्वम, काँग्रेसचे पी. चिदंबरम यांच्यासह एमडीएमकेचे अध्यक्ष वायको आणि राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

पुदुच्चेरीत एन. रंगासामी यांनी घेतली शपथ पुदुच्चेरी : एआयएनआरसीचे नेते एन. रंगासामी यांनी शुक्रवारी राज निवास येथे एका साध्या समारंभात पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन यांनी रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. या कार्यक्रमात केवळ रंगासामी यांनी तमिळ भाषेत शपथ घेतली. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूChief Ministerमुख्यमंत्री