हाईप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 11:28 AM2018-06-04T11:28:27+5:302018-06-04T11:28:27+5:30

टीव्ही मालिका वानी रानीची अभिनेत्री संगीता गिला पानायुरमध्ये एका प्रायव्हेच रिसॉर्टमधून अटक करण्यात आलीये. 

Tamil actress Sangeetha Balan held for prostitution in chennai | हाईप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला अटक

हाईप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला अटक

googlenewsNext

चेन्नई : चेन्नई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला असून यात एका तमिळ अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे. टीव्ही मालिका वीनी रानीची अभिनेत्री संगीता हिला पानायुरमधील एका प्रायव्हेट रिसॉर्टमधून अटक करण्यात आलीये. 

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे की, ज्या रिसॉर्टमध्ये सेक्स रॅकेट सुरु होतं त्यात अभिनेत्री संगीताही होती. जेव्हा पोलिसांनी इथे धाड टाकली तेव्हा या अभिनेत्रीला पाहून सर्वांनाच धक्का बसला. 


पोलिसांना आधीच माहिती मिळाली होती की, या रिसॉर्टवर सेक्स रॅकेट सुरु आहे. त्यानंतर पोलिसांनी इथे धाड टाकली. तेव्हा येथून पोलिसांनी संगीता आणि तिच्या साथीदारांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, या सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्री संगीतासह अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीही सामिल आहेत. 

रिपोर्टनुसार, पोलिसांचं म्हणनं आहे की, संगीतासह आणखी तीन अभिनेत्री या सेक्स रॅकेटमध्ये सामिल आहेत. त्यांनाही अटक करण्यात आली आहे. संगीताने तमिळ सिनेमातही काम केलं आहे. संगीताचं पूर्ण नाव संगीता बालन असं आहे. 

Web Title: Tamil actress Sangeetha Balan held for prostitution in chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.