तालुका स्वस्त धान्य दुकानदारांचा तहसीलवर मोर्चा
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:38+5:302015-02-11T00:33:38+5:30
अकोला : तालुकास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनांचा मोर्चा मंगळवार, १0 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर धडकला. संघटनांच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांकडे विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत निवेदन सादर केले.

तालुका स्वस्त धान्य दुकानदारांचा तहसीलवर मोर्चा
अ ोला : तालुकास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनांचा मोर्चा मंगळवार, १0 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर धडकला. संघटनांच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांकडे विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत निवेदन सादर केले.शांताकुमार यांचा अहवाल रद्द करून गहू व तांदूळ कमी दराने मिळावे, केरोसिन परवानाधारकांना पाच किलो गॅस सिलिंडरचा विक्री परवाना देण्यात यावा, तसेच परवानाधारकांना २0 हजार रुपये मानधन आणि शासकीय नोकरीत सामावून घ्यावे या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुकास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या ठिकाणी तहसीलदारांना मागण्यांच्या पूर्ततेबाबत निवेदन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शत्रुघ्न मुंडे, माजी महापौर मदन भरगड, उपाध्यक्ष पी.एल. सिरसाट, अनिता देशमुख, शंकर झटाले, विष्णुदत्त शुक्ला, शंकरराव महल्ले, शामुशेट अग्रवाल, प्रफुल्ल लोडाया, हिरालाल जयस्वाल, अनंता ओळंबे, गुलाबराव ढोमणे, ह.स.माहोरे, गोकर्णाबाई वाघ, सुनील वानखडे, आर.एल. अस्वाल, लता मेश्राम, फकिरचंद अग्रवाल, अजय शेळके, चंदाबाई गाडे, नाना वानखडे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)फोटो : 11 सीटीसीएल ...कॅप्शन : मोर्चात सहभागी झालेले तालुका स्वस्त धान्य दुकानदार.-----