व्हॅलेंटाइन डेची बातच काही और... बेस्ट ऑफ लक : असे करा नियोजन

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:18+5:302015-02-14T23:50:18+5:30

प्रत्येक दिवस निराळा असतो, पण व्हॅलेंटाइन डेची बातच काही और. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तरुण या प्रीतीदिनाची आतुरतेने वाट बघत असतात. प्रत्येक तरुण या दिवशी काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस साजरा करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स...

Talk about Valentine's Day, something else ... Best of luck: Do this as planned | व्हॅलेंटाइन डेची बातच काही और... बेस्ट ऑफ लक : असे करा नियोजन

व्हॅलेंटाइन डेची बातच काही और... बेस्ट ऑफ लक : असे करा नियोजन

रत्येक दिवस निराळा असतो, पण व्हॅलेंटाइन डेची बातच काही और. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तरुण या प्रीतीदिनाची आतुरतेने वाट बघत असतात. प्रत्येक तरुण या दिवशी काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस साजरा करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स...

* सगळ्यात आधी ठरवा की तुम्हाला व्हॅलेंटाइन डे कसा साजरा करायचा आहे. तुम्ही आपल्या जोडीदारासोबत एकटेच एकांत स्थळी जाऊ इच्छिता की आपल्या मित्रांसोबत व्हॅलेंटाइन डेचा आनंद लुटू इच्छिता.

* हे ठरविल्यानंतर त्याजागी जाण्यापूर्वी तिथे बुकिंग करावे लागते का? हे बघा. बुकिंगची व्यवस्था असेल तर आधीच बुकिंग करून ठेवणे योग्य.

* आता तुम्हाला कसे तयार व्हायचे आहे याचा विचार करा. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे दिसायचे आहे हे मनाशी पक्के ठरवा. सगळ्यात आधी केशरचनेचा विचार करा. कारण काही वेळेस केसांमुळेच सर्व मेहनतीवर पाणी फिरते. तुमची केशरचना फॅशननुसार आहे की नाही हे तपासून बघा.

* त्यानंतर कपड्यांचा विचार करा. वेशभूषा कशी करावी, हा फार मोठा प्रश्न असतो. ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबलही वाटेल असेच कपडे निवडा. वेळेवर धावपळ करण्यापेक्षा आधीच डिझाइन आणि रंग ठरवून ड्रेस तयार करून घ्या. शक्य असेल तर एक-दोनदा ट्राय करून पाहा.

* जास्त भडक मेकअप करू नका. हळुवार संगीतात, प्रकाशात तुम्ही प्रियेला भेटाल तर तुमचा मेकअपही रोमँटिकच असायला हवा.

* प्रियेची पसंती लक्षात घेऊनच भेटवस्तू खरेदी करा. भेटवस्तूचे पॅकिंग नवीन पद्धतीचे असेल हे ध्यानात घ्या. पॅकिंग अशी असावी ती भेटवस्तूची आठवण कायस्वरूपी त्याच्या हृदयात कोरली जाईल.

* व्हॅलेंटाइन डेला तुमच्या प्रियेसमोर प्रेम जाहीर करा, पण ध्यानात घ्या की प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात. भावनेच्या आहारी जाऊन असे कोणतेच काम करू नका की नंतर प›ात्तापाखेरीज काहीच हाती लागणार नाही.


फोटो : 14 सीटीसीएल 50
----

Web Title: Talk about Valentine's Day, something else ... Best of luck: Do this as planned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.