शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२०२९ पर्यंत अर्ध्या, तर या वर्षापर्यंत संपूर्ण भारतावर कब्जा करणार, तालिबानचा खतरनाक प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 16:32 IST

Taliban Viral Video: अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केल्यानंतर आता तालिबानने संपूर्ण जग कब्ज्यात आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या दहशतवादी संघटनेचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केल्यानंतर आता तालिबानने संपूर्ण जग कब्ज्यात आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या दहशतवादी संघटनेचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तालिबानी सैनिक २०२९ पर्यंत अर्ध्या भारतावर कब्जा करण्याचा दावा करत आहेत. तसेच २०७० पर्यंत अर्ध्या जगावर तालिबानचा कब्जा होईल, असा दावा या व्हिडीओमध्ये करण्याता आला आहे. तालिबानचा हा सैनिक अनेक देशांची नावं घेत आहे. सध्यातरी गुप्तचर यंत्रणा या व्हिडीओची पडताळणी करत आहेत. हा प्रोपेगंडा व्हिडीओ कुठे तयार करण्यात आला आणि त्याचा नेमका हेतू काय याचा शोध घेतला जात आहे.

गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांनुसार हा व्हिडीओ एका मिनिटापेक्षा अधिकचा आहे. त्यामध्ये दहशतवादी संघटना तालिबानचे सैनिक आपल्या हत्यारांचं प्रदर्शन करत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये जगातील कुठल्या देशावर कधी कब्जा केला जाईल हे क्रमवार पद्धतीने नमूद करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये एक नकाशा दाखवण्यात आला आहे. तसेच या नकाशामध्ये वेगवेगळ्या देशांची नावं लिहिण्यात आली आहे. तर नकाशाच्या शेजारी सुरू असलेल्या व्हिडीओमध्ये वर्षं दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला की, २०२९ पर्यंत अर्ध्या भारतावर, २०३२ पर्यंत अर्ध्या इराणवर, २०३५ पर्यंत संपूर्ण भारतावर, २०३७ पर्यंत तुर्कमेनिस्तानवर सन २०३० पर्यंत संपूर्ण इराणवर तर २०७० येईपर्यंत तालिबान रशियावर कब्जा करेल, असा दावा करण्यात आला आहे.

या संपूर्ण व्हिडीओमध्ये सुमारे एक डझन देशांची नावं घेण्यात आली आहेत. मात्र या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचं नाव घेण्यात आलेलं नाही. या व्हिडीओमध्ये  तालिबानी सैनिक परेडच्या धर्तीवर वेगवेगळ्या देशांवर कब्जा दाखवत आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ कुठल्या दहशतवादी संघटनेने बनवला आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र या व्हिडीओचा हेतू हा भोळ्याभाबड्या तरुणांना भरकटवून दहशतवादी संघटनांमध्ये सामील करून घेण्याचा आहे. मात्र हा व्हिडीओ पाकिस्तानी तालिबानचा आहे की अफगाणिस्तानमधील तालिबानचा आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

टॅग्स :IndiaभारतTalibanतालिबानterroristदहशतवादी