तळेगावला १३ जागा २७ उमेदवार निवडणूक : सिध्देश्वर विरूध्द बिरोबा मंडळ
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
तळेगाव दिघे : तळेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून सिध्देश्वर शेतकरी विकास मंडळ व बिरोबा शेतकरी विकास मंडळ यांच्यात सरळ लढती होणार आहेत.
तळेगावला १३ जागा २७ उमेदवार निवडणूक : सिध्देश्वर विरूध्द बिरोबा मंडळ
तळेगाव दिघे : तळेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून सिध्देश्वर शेतकरी विकास मंडळ व बिरोबा शेतकरी विकास मंडळ यांच्यात सरळ लढती होणार आहेत. तळेगाव सोसायटीची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी यांच्या अधिपत्याखाली १३ मार्चला होत आहे. निवडणूकीत सर्वसाधारण गटातून ८, अनुसूचित जाती-जमाती गटातून १, महिला राखीव गटातून २, इतर मागास प्रवर्ग गटातून १ व भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून १ अशा १३ जागांसाठी एकूण २७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. नामदेव दिघे, तात्यासाहेब दिघे, बाबूराव दिघे, बाळासाहेब दिघे यांच्या नेतृत्वाखालील सिध्देश्वर मंडळ व प्रभाकर कांदळकर यांच्या नेतृत्वाखालील बिरोबा मंडळात चूरस पहावयास मिळणार आहे. (वार्ताहर)