शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:34 IST

Priyanka Gandhi News: केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी नेसून कुटुंबीय आणि नातेवाईकांसह संसद भवनामध्ये आलेल्या प्रियंका गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. प्रियंका गांधी ह्या लोकसभेच्या खासदार बनल्याने गांधी कुटुंबातील तीन सदस्य आता संसदेत दिसणार आहेत. त्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे  लोकसभेचे तर त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी ह्या राज्यसभेच्या सदस्य आहेत.

आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी प्रियंका गांधी ह्या आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्यासोबत संसद भवनामध्ये आल्या. त्यावेळी राहुल गांधी यांनी संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर प्रियंका गांधी यांना थांबवून एक फोटो काढला. प्रियंका गांधी यांचा शपथविधी पाहण्यासाठी त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया हेही पोहोचले होते.

शपथ घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना नमस्कार करून अभिवादन केलं. तसेच विरोधी पक्षांच्या पहिल्या रांगेत बसलेल्या नेत्यांनाही नमस्कार केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि प्रियंका गांधी यांचे बंधू राहुल गांधी यांनीही त्यांना नमस्कार करत अभिवादनाचा स्वीकार केला.  प्रियंका गांधी २०१९ पासून सक्रिय राजकारणात आहेत. त्या पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र कुठल्याही सभागृहाच्या सभासद म्हणून त्या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा