शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

DK Shivakumar : "आता 10-12 टक्के कमिशन घेतात डीके शिवकुमार", काँग्रेस नेत्यांचा आरोप केल्याचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:52 IST

DK Shivakumar : व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षाचे नेते व्ही एस उग्रप्पा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

बंगळुरू : कर्नाटकमध्येकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्याशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्ताधारी पक्ष भाजपानेही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे दोन नेते शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षाचे नेते व्ही एस उग्रप्पा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर, पक्षाचे नेते सलीम अहमद यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. (Karnataka: Congress expels media coordinator for accusing Shivakumar of corruption in viral video)

व्हिडिओमध्ये काय आहे? या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे माजी लोकसभा खासदार व्ही एस उग्रप्पा आणि कर्नाटक काँग्रेसचे मीडिया समन्वयक सलीम गुप्तपणे बोलताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, मीडिया समन्वयक सलीम म्हणतात की, शिवकुमार 10-12 टक्के लाच घेतात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी याद्वारे शेकडो कोटींची संपत्ती गोळा केली आहे.

सलीम यांनी आरोप केला की, शिवकुमार आधी 6 ते 8 टक्के कमिशन घेत होते, पण आता ते वाढवून 10-20 टक्के केले आहे. ते म्हणाले की, हा एक मोठा घोटाळा आहे आणि तुम्ही जितके जास्त खोदला तर  जास्त बाहेर पडेल. शिवकुमार यांचा सहयोगी मुलगुंडने 50 ते 100 कोटी कमावले आहेत, असा आरोपही सलीम यांनी केला आहे.

शिवकुमार यांच्यावर दारू पिण्याचा आरोपव्हिडिओमध्ये सलीम यांनी शिवकुमार यांच्यावर दारू प्यायल्याचा आरोप करतानाही ऐकू येत आहे. शिवकुमार हे अनेकदा बोलताना अडखळतात. पण, मला माहीत नाही की, हे कमी रक्तदाबामुळे किंवा दारूमुळे. आम्ही लोकांनी अनेक वेळा चर्चाही केली आहे, असे सलीम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस