नोबेल आणा, 100 कोटी घ्या - चंद्राबाबू नायडू

By Admin | Updated: January 5, 2017 19:21 IST2017-01-05T19:07:10+5:302017-01-05T19:21:32+5:30

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील शास्त्रज्ञांसाठी एका ऑफरची घोषणा केली.

Take Nobel, get 100 crores - Chandrababu Naidu | नोबेल आणा, 100 कोटी घ्या - चंद्राबाबू नायडू

नोबेल आणा, 100 कोटी घ्या - चंद्राबाबू नायडू

>
ऑनलाइन लोकमत
 तिरुपती, दि. 5 - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील शास्त्रज्ञांसाठी एका ऑफरची घोषणा केली आहे. ती ऐकून तुम्हालासुद्धा धक्का बसेल. ती म्हणजे, नोबेल पुरस्कार मिळवणा-या राज्यातील शास्त्रज्ञांना राज्य सरकारकडून 100 कोटी रुपयांच्या स्वरूपात बक्षीस देण्यात येईल, असे एन. चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. तिरुपती येथील इंडियन सायन्स काँग्रेसच्या 104व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिलेली ही ऑफर नोबेल पुरस्कारासोबत मिळणा-या किमतीच्या १७ पटीने जास्त आहे. नोबेल पुरस्कारासोबत देण्यात येणारी किंमत ही 5.96 कोटींच्या आसपास असते. दरम्यान, भारतातील कोणत्याही राज्याने एवढ्या मोठ्या किमतीची ऑफर दिली नाही. 
या आधीही एन. चंद्राबाबू नायडू यांनी 10 कोटींची ऑफर दिली होती. त्याचबरोबर नोबेल पुरस्कार जिंकण्यासाठी काय करता येऊ शकेल ? यासाठी जपानचे नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर तकाजी कजिता यांच्याकडून सल्ला मागितला असल्याचेही यावेळी एन. चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.  

Web Title: Take Nobel, get 100 crores - Chandrababu Naidu