शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या एअर स्ट्राइकवेळी विरोधकांनाही विमानाला बांधून न्या - व्ही. के. सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 18:28 IST

पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर  केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर  केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. ''पुढच्या वेळी भारताकडून अशी कारवाई होत असताना जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना विमानाखाली बांधून घेऊन जावे, असे व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी लष्करप्रमुख आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्ही. के. सिंह यांनी एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ''पुढच्या वेळी जेव्हा अशी कारवाई होईल, तेव्हा विरोधी पक्षांमधील जी मंडळी शंका घेते त्यांनाही हवाई दलाने विमानाखाली बांधून सोबत नेले पाहिजे, असे मला वाटते. जेव्हा बॉम्ब टाकले जातील, तेव्हा ते पाहू शकतील. त्यानंतर त्यांना तिथेच सोडावे, जेणेकरून ते हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा मोजून परत येऊ शकतील.'' व्ही. के. सिंह यांनी याआघाडीही एअरस्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विरोधी पक्षनेते,  प्रसारमाध्यमे आणि विद्यार्थी नेत्यांवर टीका केली होती. सध्याची परिस्थिती पाहता देशांतर्गत भागातही एक सर्जिकल स्ट्राइक होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. '' दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारताने इस्राइलचे अनुकरण केले पाहिजे, असे देशातील जनतेला वाटते. मात्र असे विरोधी पक्ष असतील तर ते होणार नाही. इस्राइलमधील विरोधी पक्ष आपल्या सैन्यावर संशय घेत नाही. तसेच त्यांना अपमानितही करत नाही. जेव्हा लष्कराकडून ऑपरेशन म्युनिकसारख्या कारवाई केली जाते, तेव्हा तिच्यावर शंका घेतली जात नाही, असे व्ही. के. सिंह म्हणाले. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारतPoliticsराजकारण