दहशतवाद्यांविरोधात तात्काळ कारवाई करा, नवाज शरीफांना आली जाग
By Admin | Updated: October 6, 2016 12:02 IST2016-10-06T12:01:49+5:302016-10-06T12:02:38+5:30
भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अखेर जाग आली असून दहशतवाद्यावंरिोधात तात्काळ कारवाईचे आदेश लष्करला दिले आहेत

दहशतवाद्यांविरोधात तात्काळ कारवाई करा, नवाज शरीफांना आली जाग
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 6 - भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अखेर जाग आली असून दहशतवाद्यावंरिोधात तात्काळ कारवाईचे आदेश लष्करला दिले आहेत. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा मलीन होत असल्याच्या पार्श्वभुमीवर नवाज शरीफ सरकारने लष्करातील वरिष्ठ अधिका-यांना लवकरात लवकर जैश-ए-मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. डॉन वृत्तपत्राने हे वृत्त दिलं असून यासंबंधी उच्चस्तरीय बैठक झाल्याची माहिती दिली आहे.
मंगळवारी अधिका-यांची खासगी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी नवाज शरीफ सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि लष्करातील अधिकारी उपस्थित होते. लष्कर अधिका-यांना यावेळी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. पठाणकोट हल्ल्याचा तपास पुर्ण करण्यासाठी तसंच रावळपिंडी न्यायालयात मुंबई हल्ल्यासंबंधी सुरु असलेला खटला लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या बैठकीत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री सहभागी होते. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अजीज चौधरी यांनी यावेळी प्रेझेंटेशन दिलं. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे संचालक रिझवान अख्तरही बैठकीत उपस्थित होते.