‘संपूर्ण काश्मीर घेईन’
By Admin | Updated: September 21, 2014 01:17 IST2014-09-21T01:17:51+5:302014-09-21T01:17:51+5:30
पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) भारताकडून संपूर्ण काश्मीर घेईल, असे पीपीपीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटले.

‘संपूर्ण काश्मीर घेईन’
इस्लामाबाद : पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) भारताकडून संपूर्ण काश्मीर घेईल, असे पीपीपीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटले. पंजाब प्रांतातील मुलतान येथे शुक्रवारी बिलावल भुट्टो पक्ष कार्यकत्र्याच्या बैठकीत बोलत होते. अवघ्या 2क् वर्षाच्या भुट्टो यांना पाकिस्तानातील नव्या पिढीचे नेते समजले जाते. काश्मीर हा पाकिस्तानचाच असल्यामुळे काश्मीरची इंचभर भूमीही मी मागे ठेवणार नाही, असे बिलावल भुट्टो यांनी सांगितले. भुट्टो यांच्या या घोषणोचे स्वागत युसूफ रझा गिलानी व राजा परवेझ अशरफ या माजी पंतप्रधानांनी केले. 2क्18 मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची घोषणा बिलावल भुट्टो यांनी केलेली आहे. भारताशी चांगले संबंध असावेत, असे अधिकृत धोरण असलेल्या पीपीपीचे बिलावल भुट्टो हे प्रमुख आहेत. (वृत्तसंस्था)
भारताची प्रतिक्रीया
च्नवी दिल्ली : भारताची एकात्मता आणि ऐक्य यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, अशा शब्दांत भारताने बिलावल भुट्टो झरदारी यांची ‘ती इच्छा वस्तुस्थितीपासून दूर’ असल्याचे म्हटले.