शहरं
Join us  
Trending Stories
1
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
2
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
3
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
4
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
5
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
6
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
7
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
8
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
9
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
10
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
11
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
12
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
13
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
14
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
15
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
16
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
17
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
18
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
19
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
20
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट

'महामार्गाच्या कामात अडथळे आणणाऱ्या आमदार-खासदारांवर कठोर कारवाई करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:26 IST

नितीन गडकरी यांचे यंत्रणांना निर्देश; ‘सीबीआय’, ‘ईडी’ला पाठविले पत्र

नागपूर : महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामात अडथळे आणत ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या सर्वपक्षीय आमदार-खासदार तसेच लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. राज्यातील अनेक भागातकाही आमदार-खासदारांकडून कंत्राटदारांकडे खंडणी तसेच ‘कमिशन’ची मागणी होत आहे व तशा अनेक तक्रारी गडकरी यांना प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गांभिर्याने दखल घेत गडकरी यांनी सोमवारी तातडीने दिल्ली येथे संबंधित विभागाची बैठक घेतली व यात हे निर्देश दिले. विशेष म्हणजे या प्रकरणात ‘सीबीआय’ (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन), ‘ईडी’ (एन्फोर्समेन्ट डिरोक्टोरेट) व केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र पाठवून चौकशी करण्याची सूचनादेखील करण्यात आली आहे.महाराष्ट्रांतील मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. परंतु काही ठिकाणी आमदार-खासदारांकडून कंत्राटदारांना ‘अडवणूक’ करण्यात येत आहे. जर खंडणी-कमिशन मिळाले नाही तर प्रशासनावर दबाव आणून काम बंद करू अथवा आंदोलन करू, अशा धमक्या देण्यात येत आहेत. यासंदर्भात काही कंत्राटदार तसेच सामाजिक संघटनांनी संंबंधित आमदार-खासदारांसोबत फोनवर झालेल्या संभाषणाचे ‘रेकॉर्डिंग’च गडकरी यांच्याकडे पाठविले. तसेच हे लोकप्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकारी व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनादेखील धमक्या आणि शिवीगाळ करुन त्यांच्यावर दबाव आणत असल्याची माहितीही त्यांना प्राप्त झाली.केंद्रीय तपास यंत्रणांना पाठविण्यात आलेल्या या पत्रांसोबत लोकप्रतिनिधी व कंत्राटदार यांच्या संभाषणांचे पुरावेदेखील जोडण्यात आले आहेत. दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचेदेखील या पत्रात नमूद केले आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेवरील ‘चेकपोस्ट’वरदेखील मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी गडकरी यांना प्राप्त झाल्या होत्या. धाडी घालण्याची सूचना या ‘सीबीआय’, ‘ईडी’ व केंद्रीय दक्षता आयोग या तिन्ही यंत्रणांना करण्यात आली आहे. गडकरींच्या या पावित्र्यामुळे माहामागार्ची कामे सुरळीत होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.नागरिकांनी पोलीस तक्रारी करण्याचे आवाहनयासंदर्भात ‘लोकमत’ने नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित वृत्ताला दुजोरा दिला. जर कुणीही लोकप्रतिनिधी अशा प्रकारे ‘ब्लॅकमेलिंग’ करून विकासाच्या कामात अडथळे आणत असेल तर कंत्राटदार व नागरिकांनी याबाबतचे फोनवरील संभाषण ‘रेकॉर्ड’ करून तसेच पुराव्यांसह थेट पोलिसांत तक्रार करावी, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCBIगुन्हा अन्वेषण विभागEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय