शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 00:25 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,३९५ वर पोहोचली आहे, तर गेल्या २४ तासांत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक १३३६ सक्रिय रुग्ण आहेत.

देशभरात कोरोना संसर्गाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,३९५ वर पोहोचली आहे, तर गेल्या २४ तासांत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. केरळमध्ये सर्वाधिक १३३६ सक्रिय रुग्ण आहेत.

कर्नाटक सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये, लोकांना नियमितपणे हात धुण्याची सवय लावण्याचा, खोकताना/शिंकताना शिष्टाचार पाळण्याचा, गर्दी टाळण्याचा आणि आवश्यक असल्यास मास्क वापरण्याचा सल्ला दिलाय.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील एका ७१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू न्यूमोनिया, सेप्टिक शॉक आणि किडनीच्या तीव्र आजारामुळे झाला. कर्नाटकातील एका ६३ वर्षीय रुग्णाचा, केरळमधील एका ५९ वर्षीय रुग्णाचा आणि उत्तर प्रदेशातील एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण संख्या?

केरळ- १,३३६, महाराष्ट्र- ४६७, दिल्ली- ३७५, गुजरात- २६५, कर्नाटक- २३४, पश्चिम बंगाल- २०५, तामिळनाडू- १८५ ,उत्तर प्रदेश- ११७, राजस्थान- ६०, पुडुचेरी- ४१, हरयाणा- २६, मध्य प्रदेश- १६, झारखंड- ६, पंजाब- ५

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्र