हिंदी विषयावरील परिपत्रक मागे घ्या

By Admin | Updated: September 15, 2014 03:56 IST2014-09-15T03:56:28+5:302014-09-15T03:56:28+5:30

विद्यापीठांनी इंग्रजीसोबतच हिंदी विषयाला प्राथमिक भाषा म्हणून लागू करावे

Take back circulars on Hindi subjects | हिंदी विषयावरील परिपत्रक मागे घ्या

हिंदी विषयावरील परिपत्रक मागे घ्या

चेन्नई : विद्यापीठांनी इंग्रजीसोबतच हिंदी विषयाला प्राथमिक भाषा म्हणून लागू करावे, या केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकाला खुद्द भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) पीएमके आणि एमडीएमके या घटक पक्षांनी विरोध केला आहे़ हे हिंदी लादण्याचे प्रयत्न आहेत़ त्यामुळे संबंधित परिपत्रक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी या पक्षांनी केली आहे़
केंद्रीय गृहमंत्रालयाने अलीकडे विद्यापीठांसाठी परिपत्रक जारी केले आहे़ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदीला प्राथमिक भाषा म्हणून शिकवले जावे़ तसेच कायदा आणि वाणिज्य हे दोन विषयही हिंदीतून शिकवले जावेत, असे या परिपत्रकात म्हटले आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Take back circulars on Hindi subjects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.