शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 10:10 IST

योग गुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. दोनपेक्षा अधिक मुलांना जन्माला घालणाऱ्यांचा मतदान अधिकार काढून घ्या, अशी मागणी बाबा रामदेव यांनी केली आहे.

ठळक मुद्देदोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्यांकडून मतदानाचा अधिकार काढून घ्या - बाबा रामदेव दोनपेक्षा अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी देऊ नये - बाबा रामदेव

अलिगड - योग गुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. ''दोनपेक्षा अधिक मुलांना जन्माला घालणाऱ्यांचा मतदान अधिकार काढून घ्या. शिवाय, अशा लोकांना निवडणूक लढण्यासही परवानगी दिली जाऊ नये'', असे परखड मत बाबा रामदेव यांनी मांडले आहे.  तसंच, दोनपेक्षा अधिक मुलं जन्माला घालणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरीचीही संधी नाकारण्यात यावी, असंही बाबा रामदेव म्हणालेत. 

स्वर्ण जयंती नगरमध्ये बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान बाबा रामदेव यांनी विधान केले आहे. या कार्यक्रमादरम्यान लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात ते म्हणाले की, ''जर एखाद्या व्यक्तीनं दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म दिला तर त्यांना सरकारी सेवासुविधांचा लाभ मिळू नये आणि सोबत त्यांचा मतदानाचाही अधिकार काढून घ्यावा.  तसंच अशा लोकांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश देऊ नये, सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर औषधोपचार केले जाऊ नयेत. या सर्व गोष्टी रोखल्यानंतरच लोकसंख्येवर आपोआप नियंत्रण येईल''. 

''काँग्रेसची अंतर्गत बाब'' यादरम्यान, बाबा रामदेव यांनी प्रियांका गांधी यांना सोपवण्यात आलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीसपदाच्या जबाबदारीसंदर्भातही प्रतिक्रिया दिली. ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे.  युद्धाच्या आखाड्यात पहेलवान ताकदवान असेल पाहिजेत, तेव्हाच जय आणि पराजयामध्ये मजा येते, असे बाबा रामदेव यांनी म्हटले.

 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाCentral Governmentकेंद्र सरकार