५० हजार रूपये घेवून गर्भपात कर!
By Admin | Updated: December 4, 2014 16:26 IST2014-12-04T16:26:39+5:302014-12-04T16:26:39+5:30
चार भावाने बलात्कार केलेल्या पीडित तरुणीला ५० हजार रूपये घेवून गर्भपात करण्याचा अजब सल्ला बिहारमधील एका पंचातीने दिल्याचे उघड झाले.
५० हजार रूपये घेवून गर्भपात कर!
बलात्कार पीडितेला पंचायतीचा अजब सल्ला
ऑनलाइन लोकमत
पटना, दि. ४ - चार भावाने बलात्कार केलेल्या पीडित तरुणीला ५० हजार रूपये घेवून गर्भपात करण्याचा अजब सल्ला बिहारमधील एका पंचातीने दिल्याचे उघड झाले. चार भावाने बलात्कार केलेली पीडित मुलगी सध्या ७ महिन्यांची गर्भवती आहे.
पटनापासून ४०० कि.मी अंतरावर असलेल्या किशनगंज जिल्हयातील पाकोला पालशमणी गावातील ही घटना उघडकीस आली असून पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनूसार हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. पीडित मुलगी राहत असलेल्या गावातील चार भावाने हा बलात्कार केल्याचे पीडित तरूणीचे म्हणणे आहे.
सध्या पीडित मुलगी ७ महिन्यांची गर्भवती असून बलात्कार झाल्यानंतर गावातील पंचायतीकडे न्याय मागण्यासाठी पीडित तरूणी गेली असता पंचायतीने तिला ५० हजार रूपये घेवून गर्भपात करण्याचा सल्ला दिला. पण हा सल्ला आपल्याला मान्य नाही असे सांगत पीडित तरूणीने न्याय मिळविण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. १६ वर्षीय पीडित तरुणीचे आई-वडील गरीब असून रोजंदारीवर काम करतात. मुलीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीसांनी दिली.