२ लाख घ्या अन् गर्भपात करा : पंचायतीचा अजब आदेश
By Admin | Updated: September 24, 2014 16:59 IST2014-09-24T16:13:04+5:302014-09-24T16:59:09+5:30
एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला २ लाख रूपये घेण्याचा आणि गर्भपात करण्याचा अजब सल्ला बिहारमधील एका पंचायतीने दिला.

२ लाख घ्या अन् गर्भपात करा : पंचायतीचा अजब आदेश
>ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरपूर, दि. २३ - एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला २ लाख रूपये घेण्याचा आणि गर्भपात करण्याचा अजब सल्ला बिहारमधील एका पंचायतीने दिला. मात्र आम्हाला पैसे नाही तर न्याय हवा असे सांगत पीडित मुलीच्या कुटूंबियानी पंचायतीचा सल्ला धुडकावून लावला.
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हयातील सुभानकारपूर गावात ही घटना घडली आहे. पंचायतीने दिलेला सल्ला धुडकावून लावत पीडित मुलीच्या कुटूंबाने आरोपीविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या कुटूंबाने तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही या घटनेचा तपास करीत असून आरोपीविरूध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुझफ्फरपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र राणा यांनी माहिती दिली.