तंटामुक्त पुरस्कारप्राप्त भांबेरी गावाला पाच लाखांचे बक्षीस
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:53+5:302015-02-14T23:51:53+5:30
भांबेरी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त झालेल्या भांबेरी गावाला पाच लाखांचे बक्षीस बुधवारी मिळाले. या संदर्भात आकोट येथील शहर पोलीस स्टेशनामधील सभागृहात उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप चव्हाण, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय गोविंदराव देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त भांबेरी गावाचे बक्षीस तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेशराव बोंबटकार यांना देण्यात आले.

तंटामुक्त पुरस्कारप्राप्त भांबेरी गावाला पाच लाखांचे बक्षीस
भ ंबेरी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त झालेल्या भांबेरी गावाला पाच लाखांचे बक्षीस बुधवारी मिळाले. या संदर्भात आकोट येथील शहर पोलीस स्टेशनामधील सभागृहात उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप चव्हाण, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय गोविंदराव देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त भांबेरी गावाचे बक्षीस तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेशराव बोंबटकार यांना देण्यात आले.याप्रसंगी पोलीस पाटील गणेश भिसे, तसेच माजी सरपंच तथा भाजप तालुका अध्यक्ष राजाभाऊ राजनकर, गणेशराव उमाळे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्राप्त सोहळा पार पडला. (वार्ताहर)फोटो : १२एकेटीपी१५.जेपीजी