ताजमहाल पिवळा पडत नाहीय!
By Admin | Updated: May 13, 2015 22:38 IST2015-05-13T22:38:21+5:302015-05-13T22:38:21+5:30
ताजमहाल प्रदूृषणामुळे पिवळा पडत नाहीय. या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य जपण्यासाठी सरकार सर्वोपरी प्रयत्न करीत आहे

ताजमहाल पिवळा पडत नाहीय!
नवी दिल्ली : ताजमहाल प्रदूृषणामुळे पिवळा पडत नाहीय. या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य जपण्यासाठी सरकार सर्वोपरी प्रयत्न करीत आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी बुधवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
ताजमहालच्या परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. प्रेमाचे प्रतीक असलेले हे १८ व्या शतकातील जगप्रसिद्ध स्मारक चांगल्या स्थितीत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन पूर्ण खबरदारी घेत आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) हवेच्या गुणवत्तेची नियमित पाहणी चालवली आहे. संगमरवरी दगडावर कोणताही परिणाम हाऊ नये यासाठी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची कामे सुरू आहेत.
युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केल्याच्या पार्श्वभूमीवर ताजमहालचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेतली जात असल्याचा शर्मा यांनी इन्कार केला.