टहलियानी नवे लोकायुक्त (पान १)

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:26+5:302015-07-06T23:34:26+5:30

टहलियानी नवे लोकायुक्त

Tahiliani new Lokayukta (page 1) | टहलियानी नवे लोकायुक्त (पान १)

टहलियानी नवे लोकायुक्त (पान १)

लियानी नवे लोकायुक्त
मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फासावर चढवण्याचा निकाल देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी यांचे नाव राज्याच्या लोकायुक्तपदी निश्चित करण्यात आले असून त्यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा बाकी आहे.
राज्याचे लोकायुक्तपद गेले एक वर्ष रिक्त असून उपलोकायुक्तपदावरही नोव्हेंबर महिन्यापासून नियुक्ती नाही. लोकायुक्तांकडील ४ हजार प्रकरणे सुनावणीच्या प्रतिक्षेत आहेत. टहलियानी हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील असून तेथे सरकारी वकील म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला. १९८७ मध्ये त्यांची मुंबईत महानगर दंडाधिकारी पदावर नियुक्ती झाली. गुलशनकुमार खून खटला, दत्ता सामंत खून खटला अशा गाजलेल्या खटल्यांचे कामकाज त्यांनी केले. मुंबईवर २६-११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याच्यावरील खटल्याचे कामकाज केवळ वर्षभरात पूर्ण करून टहलियानी यांनी त्याच्या फाशीचा निकाल दिला. मार्च २०११ पासून टहलियानी हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कामकाज करीत असून त्यांची त्या पदावरील मुदत २३ डिसेंबर २०१५ रोजी संपत आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Tahiliani new Lokayukta (page 1)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.