शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

तहव्वूर राणाने वकिलाबाबत ठेवली एक मोठी अट; न्यायालयानेही केली मान्य, न्यायाधीश म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 21:52 IST

Tahawwur Rana News Updates: न्यायालयातील सुनावणीत तहव्वूर राणाने त्याच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांबाबत एक अट ठेवली होती, असे सांगितले जात आहे. 

Tahawwur Rana News Updates: मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्ळूर राणा याची राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) १८ दिवसांच्या कोठडीच्या कालावधीत सखोल चौकशी करणार आहे. त्याने केवळ मुंबईच नव्हे तर भारतातील इतर शहरांमध्येही दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट आखला होता असा युक्तिवाद एनआयएने दिल्लीतील न्यायालयात केला. हल्ल्याचा कट आखताना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय तसेच कोणकोणते दहशतवादी गट सामील होते याची माहिती त्याच्याकडून मिळविली जाणार आहे. यातच आता न्यायालयातील सुनावणीत तहव्वूर राणाने त्याच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांबाबत एक अट ठेवली होती, असे सांगितले जात आहे. 

राणा हा पाकिस्तानचा मूळ रहिवासी असून, त्याने नंतर कॅनडाचे नागरिकत्व पत्करले. तो मुंबई हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीचा (ऊर्फ दाऊद गिलानी) निकटवर्तीय आहे. तहव्वूर राणाला एनआयए मुख्यालयात १८ दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या मुख्यालयाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स पथकही तिथे तैनात करण्यात आले आहे.

तहव्वूर राणाने वकिलाबाबत ठेवली एक मोठी अट

मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वुर राणाने न्यायालयात सांगितले की, असा कोणताही वकील नसावा, जो त्याच्या माध्यमातून नाव आणि प्रसिद्धी मिळवू इच्छितो. यावर न्यायाधीश म्हणाले की, आरोपीचे असे म्हणणे आहे की, असा कोणताही वकील नसावा जो त्याच्या माध्यमातून नाव आणि प्रसिद्धी मिळवत असल्याचे दिसून येईल. कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा, १९८७ मध्ये तरतूद केलेली वैधानिक योजना अस्तित्वात असली तरी, आरोपीची विनंती मान्य करण्यात येत आहे आणि तसे निर्देश देण्यात आले आहेत की, कायदेशीर सेवा वकील या प्रकरणातील आरोपीबद्दल माध्यमांशी बोलू शकणार नाहीत. जर कायदेशीर सेवा वकिलाची माहिती आधीच माध्यमांना माहिती नसेल तर ती माध्यमांना उघड केली जाणार नाही, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली मुंबईत आला असताना तो राणाशी नियमित संपर्कात होता. दोघांनी परस्परांना २३०हून अधिक कॉल केले होते. राणा 'मेजर इक्बाल' नावाच्या आणखी एका आरोपीशीही संपर्कात होता. राणा स्वतःही नोव्हेंबर २००८ मध्ये, हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी भारतात आला होता. चार्जशीटनुसार, तो पवईतील एका हॉटेलमध्ये थांबला होता. दिल्लीत एनआयएने न्यायालयाला सांगितले की, २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमागील व्यापक कटाचा शोध घेण्यासाठी राणाची चौकशी अत्यावश्यक आहे. डेव्हिड कोलमन हेडली याने भारतात येण्यापूर्वी राणाला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटाची माहिती कळविली होती. तसेच आपली मालमत्ता व अन्य बाबींसंदर्भातही ई-मेल पाठविला होता. या कटात पाकिस्तानमधील इलियास काश्मिरी, अब्दुर रहमान यांचाही सहभाग असल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले.

 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालय