शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाश्त्यावर यथेच्छ ताव मारून काँग्रेस नेत्यांचे लाक्षणिक उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 15:40 IST

काँग्रेसने देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी आज एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले होते. त्यानुसार देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. मात्र राजनाधी नवी दिल्लीतील राजपथ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी...

नवी दिल्ली - काँग्रेसने देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी आज एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले होते. त्यानुसार देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. मात्र राजनाधी नवी दिल्लीतील राजपथ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी हॉटेलमध्ये नाश्त्यावर भरपेट ताव मारून नंतर उपोषणाला सुरुवात केल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे दिल्लीतील दिग्गज नेते हॉटेलमध्ये यथेच्छ ताव मारत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  दलितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात आज करण्यात आलेल्या आंदोलानामध्ये काँग्रेसची प्रतिमा उंचावण्याऐवजी पक्षाला अडचणीत आणणाऱ्या घटनाच अधिक घडल्या. एकीकडे शीख दंगलीतील आरोपी जगदीश टाइटलर आणि सज्जन सिंह राजपथावर आल्याने त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. त्यापाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नियोजित वेळेपेक्षा फार उशिरा आल्याने त्यावरूनही चर्चा रंगली होती. हे कमी म्हणून की काय उपोषणापूर्वी काँग्रेसचे नेते नाश्त्यावर ताव मारत असल्याचे फोटो व्हायरल झाल्याने काँग्रेसचे आजचे उपोषण उपहासाचा विषय बनले. या छायाचित्रांमध्ये काँग्रेसचे नेते अरविंदर सिंह लवली आणि हारुन युसूफ छोटे भटूरे खाताना दितस आहेत. तर त्यांच्यासोबत अजय माकन आणि इतर नेतेही असल्याचे दिसत आहे. भाजपा नेते मदनलाला खुराणा यांचे पुत्र हरिश खुराणा यांनी एक फोटो ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे."तिकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजघाटावर उपोषणाला बोलावून काँग्रेसचे नेते नाश्त्यावर ताव मारत आहेत. लोकांना चांगलं मुर्ख बनवताय." तर मनोज तिवारी यांनीही काँग्रेस नेत्यांना काही वेळ सुद्धा उपाशी राहता येत नाही असा टोला लगावला आहे. 

दरम्यान, काँग्रेस नेते अरविंदर सिंह यांनी सकाळी हॉटेलमध्ये नाश्ता केल्याचे मान्य केले आहे. मात्र मुख्य मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपा नको ते मुद्दे समोर आणत आहे अशी टीका त्यांनी केली आहे." आजचे उपोषण सांकेतिक होते. त्याची वेळी सकाळी 10.30 होती मग त्याआधी आम्ही काय करत होतो आणि आणि काय नाही याच्याशी बाकीच्यांचा संबंध नाही," असे ते म्हणाले.  

टॅग्स :congressकाँग्रेसNew Delhiनवी दिल्लीPoliticsराजकारणBJPभाजपा