रिक्षा चालकावर तलवार हल्ला
By Admin | Updated: December 12, 2015 00:31 IST2015-12-12T00:31:03+5:302015-12-12T00:31:03+5:30
जळगाव: दोघांमध्ये असलेल्या भांडणावरुन तिसर्यानेच रिक्षा चालक कृष्णा शंकर सपकाळे (वय ४०, रा.जैनाबाद) याच्यावर तलवार हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता वाल्मिक नगरातील बालाजी मंदीर परिसरात घडली. याबाबत रवींद्र कमलाकर बाविस्कर व गोपाल कैलास सैंदाणे (दोन्ही रा.जैनाबाद) यांच्याविरुध्द शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा चालकावर तलवार हल्ला
ज गाव: दोघांमध्ये असलेल्या भांडणावरुन तिसर्यानेच रिक्षा चालक कृष्णा शंकर सपकाळे (वय ४०, रा.जैनाबाद) याच्यावर तलवार हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता वाल्मिक नगरातील बालाजी मंदीर परिसरात घडली. याबाबत रवींद्र कमलाकर बाविस्कर व गोपाल कैलास सैंदाणे (दोन्ही रा.जैनाबाद) यांच्याविरुध्द शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा सपकाळे व मोहन खंडू भारुळे यांच्यात पुर्वी वाद झाला होता. याच वादातून गुरुवारी रात्री रवींद्र बाविस्कर व गोपाल सैंदाणे हे दोघं जण सपकाळेच्या घराजवळ तेथे गेले व तू मोहनला का मारले म्हणून त्याच्याशी वाद घातला. यावेळी त्याला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.रवींद्रने त्याच्याजवळील तलवारीने कृष्णाच्या हातावर वार केला. त्यात हल्ला चुकविताना त्याच्या बोटांना जखम झाली आहे.