Swine flu : चिंता वाढली! कोरोनापेक्षा स्वाइन फ्लूचा जास्त धोका; 'ही' आहेत लक्षणं, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 01:57 PM2024-01-13T13:57:08+5:302024-01-13T14:06:39+5:30

Swine flu : काही रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण येत नसून स्वाइन फ्लूचे रुग्ण सातत्याने येत आहेत.

swine flu vs covid 19 here how the pandemics compare | Swine flu : चिंता वाढली! कोरोनापेक्षा स्वाइन फ्लूचा जास्त धोका; 'ही' आहेत लक्षणं, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Swine flu : चिंता वाढली! कोरोनापेक्षा स्वाइन फ्लूचा जास्त धोका; 'ही' आहेत लक्षणं, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दिल्लीतील काही रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण येत नसून स्वाइन फ्लूचे रुग्ण सातत्याने येत आहेत. मात्र, डॉक्टरांच्या मते, या व्हायरसला घाबरण्याची गरज नाही. हा आजार झाला तरी वेळीच योग्य उपचार करून तो बरा होऊ शकतो. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असते. थंडीमुळे लोकांचे हाल होत आहेत. कोरोनापेक्षा स्वाइन फ्लूचा लोकांना जास्त त्रास होत आहे. सध्या दिल्लीत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 

नाक गळणं, घशाला सूज येणं, 101 पेक्षा जास्त ताप असणं, श्वास घेण्यास त्रास होणं, थकवा जाणवणं, भूक न लागणं असे प्रकार होत असतील तर वेळ न वाया घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही स्वाइन फ्लूची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणं असलेले अनेक रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लोकांनी याबाबत विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. H1N1 वेळेत आढळल्यास त्यावर उपचार शक्य आहेत.

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, या 10 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्याचबरोबर दुसरीकडे H1N1 ची प्रकरणे सातत्याने येत आहेत. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये न्यूमोनिया आणि फुफ्फुसात पॅचेस दिसणं यांचा समावेश होतो. दरवर्षी या ऋतूत असे आजार वाढतात. मात्र यावेळी या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. आजारी व्यक्तींमध्ये लहान मुलं, वृद्ध, तरुण आणि सर्व वयोगटातील महिलांचा समावेश आहे. काही रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत.

2009 मध्ये हा आजार खूप पसरला होता, तेव्हापासून हा आजार दरवर्षी दिल्लीत वेगाने पसरतो. या महिन्यांत हा रोग खूप सक्रिय होतो. लक्षणं पाहता हा कोरोना असल्याचं दिसतं. भीतीपोटी, लोक त्यांच्या कोरोना चाचण्या करून घेत आहेत, परंतु इन्फ्लूएंझा RTPCR आणि कोरोना RTPCR चाचण्यांमध्ये H1N1 संसर्गाची पुष्टी होत आहे.

तज्ज्ञांच्या मते ताप, सर्दी, घसा दुखणं, श्वास घेण्यास त्रास असे रुग्ण रुग्णालयात येत आहेत. त्यांची इन्फ्लूएंझा RTPCR आणि कोरोना RTPCR साठी चाचणी केली जात आहे. ज्यामध्ये H1N1 संसर्गाची पुष्टी होत आहे. बाहेर जाताना काही गोष्टी लक्षात ठेवा. ज्यामध्ये खोकताना आणि शिंकताना नाक आणि तोंडावर कापड, मास्क किंवा रुमाल वापरा. गर्दीच्या ठिकाणी काळीजी घ्या. जर 2-3 दिवसात ताप कमी झाला नाही तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या अशा गोष्टींचा समावेश आहे. 
 

Web Title: swine flu vs covid 19 here how the pandemics compare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.