स्वाईन फ्लू- भाग २
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:23+5:302015-02-20T01:10:23+5:30
-आयसोलेशनच्या २० खाटा रिकाम्याच

स्वाईन फ्लू- भाग २
-आ यसोलेशनच्या २० खाटा रिकाम्याचस्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णाना घेऊन आयसोलेशन वॉर्डात स्वाईन फ्लू कक्ष सुरू करणे अपेक्षित होते. परंतु दीड महिना उलटूनही या संदर्भात काहीच निर्णय घेण्यात आला नाही. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या स्थितीत आयसोलेशनमध्ये एकही रुग्ण भरती नाही. रुग्णालयातील तब्बल २० खाटा रिकाम्या पडल्या आहेत. -तीन रुग्णालय, रुग्ण मात्र शून्य महानगरपिालकेच्या तीन मोठ्या रुग्णालयात रुग्णांना भरती करून घेण्याची सोय आहे. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय आणि सदर येथील रोग निदान केंद्र. या रुग्णालयांच्या देखभालीपासून ते डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कोट्यावधी रुपये खर्च होतात. परंतु रुग्णाला याचा किती फायदा होतो, हा संशोधनाचा विषय आहे. अख्खे शहर स्वाईन फ्लूच्या दहशतीत असताना एकही रुग्ण या इस्पितळात भरती करून घेतला जात नाही. यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचे सांगून मनपाचे अधिकारी वेळ मारून नेतात.- ३८ डॉक्टरांचा ताफा पण उपचार नाहीतमनपाच्या आरोग्य विभागाकडे ३८ एमबीबीएस डॉक्टर आहेत. यातील २८ डॉक्टर नियमित असून १० डॉक्टर कंत्राटी पद्धतीवर आहे. यांच्या मदतीने स्वाईन फ्लू रुग्णांना भरती करून उपचार करणे शक्य आहे. गरज पडल्यास मेयो, मेडिकलमधील स्पेशालिस्ट डॉक्टरांची चमू मागविणे शक्य आहे. परंतु कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही.-जनजागृती नावापुरतीचस्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्याकरिता जनजागृतीसाठी पाच लाख पत्रके वितरित केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केला जात आहे. ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स लावली आहेत. परंतु शहरात रुग्णांची वाढती संख्या पाहता विशेषत: दहा वर्षाखालील लहान मुलांमध्ये हा आजार वाढत असल्याने ही जनजागृती नावापुरतीच असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. जनजागृती सोबत आवश्यक वैद्यकीय सुविधा महापालिकेेने उपलब्ध करून द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.