स्वाईन फ्ल्यू जोड

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:15+5:302015-02-13T23:11:15+5:30

स्वाईन फ्ल्यूने गुलाब आढाव (वय ३५) आणि चंद्रकला दळवी (वय ३०) श्रीगोंदा, साहेबराव गोंडाळ (वय ५०) नगर, लता सोनवणे (वय ४०) संगमनेर यांचा बळी गेलेला आहे. या सर्वांवर जिल्‘ाबाहेर पुणे आणि नाशिकला उपचार झालेले आहेत. हे सर्व संशयित स्वाईन फ्ल्यू रुग्ण असल्याचे सरकारी आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयातून घसादुखीचा त्रास असणार्‍या एकाही रुग्णाचा स्वॅब (घशातील द्रावाचा नमुना) पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आला नाही, हे विशेष म्हणावे लागेल.

Swine Flu Pair | स्वाईन फ्ल्यू जोड

स्वाईन फ्ल्यू जोड

वाईन फ्ल्यूने गुलाब आढाव (वय ३५) आणि चंद्रकला दळवी (वय ३०) श्रीगोंदा, साहेबराव गोंडाळ (वय ५०) नगर, लता सोनवणे (वय ४०) संगमनेर यांचा बळी गेलेला आहे. या सर्वांवर जिल्ह्याबाहेर पुणे आणि नाशिकला उपचार झालेले आहेत. हे सर्व संशयित स्वाईन फ्ल्यू रुग्ण असल्याचे सरकारी आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयातून घसादुखीचा त्रास असणार्‍या एकाही रुग्णाचा स्वॅब (घशातील द्रावाचा नमुना) पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आला नाही, हे विशेष म्हणावे लागेल.
....................
मागील वर्षी जिल्ह्यात वर्षभरात स्वाईन फ्ल्यूने चार मृत्यू झालेले असतांना यंदा जानेवारीतच चार जणांचा बळी गेलेला आहे. शुक्रवारी श्रीरामपूर तालुक्यात संशयित स्वाईन फ्ल्यू महिला रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याबाबतची माहिती सरकारी आरोग्य विभागाला नव्हती.
......................
स्वाईन फ्ल्यूची लक्षणे
ताप, घसा दुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंग दुखी, डोकेदुखी ही लक्षणे आहेत. पाच वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगी, मधुमेह, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार असणारे व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार असणार्‍या व्यक्ती, प्रतिकार शक्तीचा र्‍हास झालेल्या व्यक्ती, दीर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणार्‍या व्यक्ती या अतिजोखीम गटात मोडत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
.............पूर्ण............
...................

Web Title: Swine Flu Pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.