दुसऱ्या मुलीशी विवाह करणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने अॅसिड टाकून केली हत्या
By Admin | Updated: May 24, 2017 18:56 IST2017-05-24T18:56:35+5:302017-05-24T18:56:35+5:30
प्रियकाराने दुसऱ्या मुलीशी विवाह केल्याने संतापलेल्या माजी प्रेयसीने अद्दल घडवण्यासाठी त्याच्यावर

दुसऱ्या मुलीशी विवाह करणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने अॅसिड टाकून केली हत्या
>ऑनलाइन लोकमत
विजयवाडा, दि. 24 - माजी प्रेयसीने केलेल्या अॅसिड हल्ल्यात एका नवविवाहित युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आंध्र प्रदेशमधील गुंटुर जिल्ह्यात घडली आहे. या प्रियकाराने दुसऱ्या मुलीशी विवाह केल्याने संतापलेल्या माजी प्रेयसीने अद्दल घडवण्यासाठी त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा मृत्यू झाला.
आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील वेनिगंडला गावात मंगळवारी हा प्रकार घडला. मात्र हे संपूर्ण प्रकरण आज उजेडात आले. प्रेयसीने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रियकराचे नाव शेख मोहम्मद इलियास असे आहे. गेल्या सोमवारी त्याचा विवाह झाला होता.
इलियासचे हेमा बिंदू नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. पण त्याने दोन दिवसांपूर्वी पामुलापदुक गावात राहणाऱ्या अन्य मुलीशी विवाह केला होता. त्यामुळे बिंदूने इलियासशी असलेले सगळे संबंध तोडायच्या बहाण्याने त्याला आपल्यासोबतचे सारे फोटो, व्हिडिओ आणि रेकॉर्ड घेऊन आपल्या एका ऑटो ड्रायव्हर मित्राच्या बोलावले.