नावे जाहीर न करण्याच्या भूमिकेवर स्वामींची टीका
By Admin | Updated: November 9, 2014 02:32 IST2014-11-09T02:32:41+5:302014-11-09T02:32:41+5:30
केंद्र सरकारने विदेशी बँकांमध्ये खाते असलेल्या भारतीयांच्या नावांचा खुलासा न करण्यामागचे कोणतेही वैध कारण अद्याप सांगितलेले नाही, असे भाजपा नेते डॉ. सुब्रहृमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

नावे जाहीर न करण्याच्या भूमिकेवर स्वामींची टीका
कोलकाता : केंद्र सरकारने विदेशी बँकांमध्ये खाते असलेल्या भारतीयांच्या नावांचा खुलासा न करण्यामागचे कोणतेही वैध कारण अद्याप सांगितलेले नाही, असे भाजपा नेते डॉ. सुब्रहृमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना स्वामी म्हणाले, भारताने दुस:या देशांसोबत ‘डबल टॅक्ट अव्हॉयडन्स अॅग्रिमेंट’ (डीटीएए) केला आहे आणि हा करार विदेशी बँकांमध्ये खाते असलेल्यांची नावे जाहीर करण्यापासून रोखत आहे, असे केंद्र सरकार सांगते; परंतु केंद्र सरकारने दिलेले हे कारण काही वैध नाही.
तथापि, डीटीएएमध्ये गोपनीयतेचे एक उपकलम आहे, जे सरकारला नावे जाहीर करण्यापासून रोखते; परंतु ही बाधा दूर केली जाऊ शकते, असे नमूद करून स्वामी पुढे म्हणाले, प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती बनण्याआधी जेव्हा वित्तमंत्री होते तेव्हा त्यांनी जर्मनी सरकारला लाईचेस्टिनमध्ये खाते असलेल्या लोकांची नावे डीटीएए अंतर्गत जाहीर करण्याबाबत लिहिले होते. (वृत्तसंस्था)