स्वामी आत्मस्थानंद यांची प्रकृती गंभीर
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:33+5:302016-04-26T00:16:33+5:30
कोलकाता: रामकृष्ण मठ आणि मिशनचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांची प्रकृती गंभीर आहे. स्वामींवर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्वामी आत्मस्थानंद यांची प्रकृती गंभीर
क लकाता: रामकृष्ण मठ आणि मिशनचे प्रमुख स्वामी आत्मस्थानंद यांची प्रकृती गंभीर आहे. स्वामींवर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिशनचे सचिव स्वामी सुहितानंद यांनी सांगितले की, छाती आणि मूत्रमार्गातील संसर्गामुळे त्यांना ताप आला असून विशेषज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत नजर ठेवून आहे. परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे. वृद्धपकाळाशी निगडित आरोग्यविषयक समस्यांमुळे गेल्या एक वर्षांपासून स्वामी आत्मस्थानंद यांच्यावर उपचार सुरू आहेत.स्वामी आत्मस्थानंद यांची २००७ साली रामकृष्ण मठ आणि मिशनचे १५ वे प्रमुख म्हणून निवड झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ एप्रिलला रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. पंतप्रधान स्वामींना आपले गुरूमानतात. (वृत्तसंस्था)