स्वामी स्वरुपानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 24, 2014 14:15 IST2014-06-24T14:11:25+5:302014-06-24T14:15:21+5:30

शिर्डीचे साईबाबा हे देव नसल्याचे वादग्रस्त विधान करणारे द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Swami Swaroopanand filed an offense | स्वामी स्वरुपानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल

स्वामी स्वरुपानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २४ - साईबाबांविरोधात वक्तव्य करणे द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. स्वरुपानंद यांच्याविरोधात शिर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. शिर्डीचे साईबाबा हे देव नसून त्यांची पूजा करणे हा हिंदू धर्मात फूट पाडण्याचे कारस्थान असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.  
साईबाबांच्या पूजेला प्रोत्साहन देणारे लोक हिंद धर्म कमकुवत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच साईबाबा हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक नाहीत, असे वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत असून अनेक भक्तांनी त्यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झाले.
अखेर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये स्वरुपानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धार्मिक अपप्रचार करणारे, जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर लावण्यात आला आहे. 
यापूर्वीही स्वरुपानंद सरस्वती अनेक वेळा वादाच्या भोव-यात सापडले होते. लोकसभा निवडणुकीवेळी 'हर हर मोदी, घर घर मोदी ' या घोषणांवर त्यांनी आक्षेप घेतला होता. तर निवडणुकीदरम्यानच स्वरुपांनद यांनी एका पत्रकाराच्या थोबाडीत मारली होती. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी किंवा अरविंद केजरीवाल यांच्यापैकी तुम्हाला कोण योग्य उमेदवार वाटतो, असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांना विचारला असता, त्यांनी त्या पत्रकाराला थप्पड मारली होती. त्याच्या या वर्तणुकीवर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली होती.  

Web Title: Swami Swaroopanand filed an offense