शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी शिवानंद : रोज योगासने करणारी १२४ वर्षांची जगातील सर्वांत आनंदी व्यक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 06:31 IST

आजही ते रोज तब्बल दोन तास योगासने करतात. त्यामुळेच मला दीर्घायुष्य लाभले आहे, असे अभिमानाने सांगतात.

चेन्नई : जगभरातील सर्व लोक कोरोनाच्या संकटाने हादरून गेले आहेत. प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती आहे. पण १२४ वर्षे वयाचे स्वामी शिवानंद अत्यंत आनंदाने आयुष्य जगत आहेत. त्यांना कोरोनाच काय, कसलीच भीती नाही. आजही ते रोज तब्बल दोन तास योगासने करतात. त्यामुळेच मला दीर्घायुष्य लाभले आहे, असे अभिमानाने सांगतात.त्यांचा जन्म ८ आॅगस्ट १८९६ रोजीचा. त्या काळात जन्मनोंद करण्यासाठी तशी यंत्रणा नव्हती. पण मंदिरात त्यांच्या जन्माचा उल्लेख आहे. रोज दोन तास योगाभ्यास, दोन वेळा पोळी, भाजी, भात आणि वरण वा सांबार असे जेवण. बाकीचा सारा वेळ ते गीतापठनात जातो. योगाभ्यासामुळे मानसिक समाधान आणि आनंद मिळतो, असे ते अभिमानाने सांगतात.ते त्यांनी सांगायची गरजच नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सारे काही सांगतो. योगासने केल्यामुळे मला कोणतीही इच्छा (डिझायर), आजार (डिसिज) वा नैराश्य (डिप्रेशन) कधीच जाणवले नाही. या तीन ’डी’ ना माझ्या आयुष्यात स्थानच नाही. मला सारा आनंद मिळतो तो योगासनांतून, असे त्यांचे म्हणणे.त्यांना योगाभ्यासाच्या निमित्ताने आॅस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, लक्झेम्बर्ग, नेदरलँड अशा अनेक देशांचा दौरा केला आहे. तब्बल ५0 देशांना त्यांनी योगासनांची ओळख करून दिली. त्यांनी एकोणिसावे, विसावे व एकविसावे अशी तीन शतके पाहिली आहेत. मी जगातील सर्वात वृद्धच नव्हे, तर सर्वात आनंदी माणूस आहे, असे ते सांगतात. त्यांनी या प्रदीर्घ आयुष्यात प्लेग, फ्लू आणि आता कोरोना अशा भयानक साथी पाहिल्या आहेत.पण त्यांना मात्र कधीही कसलाच आजार झालेला नाही. इतके आयुष्य आणि तेही अतिशय आनंदाचे मिळावे असे अनेकांना वाटते. पण त्यासाठी स्वामी शिवानंद यांनी ज्या गोष्टींचे आचरण केले, ते करणे मात्र अजिबात सोपे नाही. अनेक जण त्यांच्या जन्मतारखेबाबत शंका उपस्थित करतात. त्यांच्या आधार कार्ड आणि पासपोर्टवर ८ आॅगस्ट १८९६ हीच जन्मतारीख आहे. ते विमानाने प्रवास करतात. विमान कंपन्यांचे कर्मचारी आणि प्रवासीही त्यांचा उत्साह पाहून थक्क होतात. स्वामी शिवानंद म्हणतात, ‘‘माझ्या जन्मतारखेबाबत कोणाला शंका असेल, तर त्यांनी माझी डॉक्टरांमार्फत हवी ती तपासणी करावी. मी १२४ वर्षांचा नाही, हे डॉक्टरांनी सिद्ध करून दाखवावेच.’’

टॅग्स :Yogaयोग