तरुणाचा संशयास्पद मृत्यू ... जोड

By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:25+5:302015-01-23T01:05:25+5:30

Suspicious death of the youth ... attachment | तरुणाचा संशयास्पद मृत्यू ... जोड

तरुणाचा संशयास्पद मृत्यू ... जोड

>काका म्हणतात, हत्या झाली
पोलिसांच्या माहितीनुसार हा अपघात रात्री १२.३० ला गोधनीच्या रेल्वेगेटजवळ झाला. त्यानुसार आज दुपारी आकाशचे काका पवन बेनीमाधो दुबे, मामा सतीश तिवारी आणि अन्य नातेवाईक अपघातस्थळाजवळ पोहचले. तेथील काही जणांनी पहाटे दीड दोन पर्यंत होतो, आम्हाला कोणताही अपघात रात्री १२.३० ला होताना दिसला नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचा संशय वाढला. त्यांनी कारची पाहाणी केली तेव्हा त्यांना फक्त कारच्या डाव्या बाजूचे दार चेपल्याचे (धडक मारल्यासारखे) दिसले. कार उलटी झाली तर, वरच्या भागाची मोडतोड कशी झाली नाही, रात्री १२.३० ला अपघात झाल्यानंतर आकाशच्या कुटुंबीयांना माहिती कळविण्यासाठी पहाटे ३ पर्यंत सोबतची मंडळी का थांबली, असे प्रश्न त्यांना पडले. त्यामुळेच त्यांनी तशी तक्रार कोराडी पोलिसांकडे करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्यामुळे त्यांनी शिवसेनेचे पंजू तोतवाणी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांसह पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार केली.
----
दुबे कुटुंबीयांचा आक्रोश, पोलिसांवरही रोष
आकाश हा दुबे परिवारातील सर्वात मोठा होता. धडधाकट आकाश बाऊन्सरसारखा दिसायचा. बारावीनंतर तो मिळेल ते काम करायचा. त्याला आशिष नामक भाऊ आणि करिश्मा नामक लहान बहीण आहे. आकाशचे वडील खासगी वाहनचालक तर आई साधना गृहिणी आहे. आजोबा निवृत्त पोलीस कर्मचारी आहे. तर, जखमी राहुलचे वडीलही ग्रामीण पोलीसमध्ये कार्यरत असल्याचे समजते. आकाशचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे. कोराडीचे पोलीस लपवाछपवी करीत असच्याचा त्यांचा आरोप असून, त्यामुळेच पोलिसांवरही रोष आहे.
----

Web Title: Suspicious death of the youth ... attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.