तरुणांचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:06+5:302015-07-08T23:45:06+5:30

तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Suspicious death of young | तरुणांचा संशयास्पद मृत्यू

तरुणांचा संशयास्पद मृत्यू

ुणाचा संशयास्पद मृत्यू
नागपूर :
सदर स्थित आदिवासी खदान परिसरातील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. आशिष इरपाची (१९) रा. बैरमजी टाऊन आदिवासी खदान असे मृताचे नाव आहे.
आशिषच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात आई आणि मोठा भाऊ मनोज आहेत. आशिषची आत्या सुद्धा परिसरातच राहते. मंगळवारी रात्री ९ वाजता आशिष घराबाहेर पडला. आत्याच्या घरी जात असेल म्हणून भावाने दुर्लक्ष केले. रात्री ११ वाजता एका तरुणाला आशिष रेल्वे रुळावर पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्याला मार होता. नातलगांनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आशिषचा मृतदेह रुळाखाली आढळून आला. रेल्वेने कटल्याचे कुठलेही निशाण नाही. त्यामुळे या घटनेला संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

Web Title: Suspicious death of young