माजी खासदाराच्या पुत्राचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:40+5:302015-02-16T21:12:40+5:30
इंदूर : भाजपचे माजी राज्यसभा सदस्य नारायणसिंह केसरी यांचे ५७ वर्षीय पुत्र प्रीतम सिंह आपल्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली़

माजी खासदाराच्या पुत्राचा संशयास्पद मृत्यू
इ दूर : भाजपचे माजी राज्यसभा सदस्य नारायणसिंह केसरी यांचे ५७ वर्षीय पुत्र प्रीतम सिंह आपल्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली़ प्रीतम सिंह आपल्या कुटुंबासोबत राहत होते़ त्यांना मद्याचे व्यसन होते़ रविवारी दिवसभर मद्यपान केल्यानंतर प्रीतम यांची प्रकृती बिघडली़ त्यांच्या कुटुंबाने त्यांना घराच्या चौथ्या माळ्यावरील आपल्या खोलीत आरामासाठी झोपवले़ मात्र रात्री उशिरा त्यांच्या शरीराची कुठलीही हालचाल होत नसल्याचे लक्षात आल्याने कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली़ शवविच्छेदनाच्या अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे़ (वृत्तसंस्था)