मथुरा : उत्तर प्रदेशातीलमथुरा जिल्ह्यात शनिवारी पहाटे हरियाणा सीमेजवळ ‘फरसावाले बाबा’ या नावाने प्रसिद्ध असलेले गोरक्षक बाबा चंद्रशेखर यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आणि पोलिसांवर जोरदार दगडफेक केली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. नबीपूर भागात गोवंश घेऊन जाणारा एक ट्रक रोखण्याचा प्रयत्न करत असताना गो-तस्करांनी बाबांना चिरडले, असा आरोप समर्थकांनी केला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, पहाटे दाट धुक्यामुळे कंटेनरची आणि ट्रकची धडक झाली, ज्यामध्ये बाबांचा जागीच मृत्यू झाला. ज्या कंटेनरची बाबा तपासणी करत होते, त्यामध्ये गोवंश नसून शॅम्पूसारख्या वस्तू होत्या, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अफवांमुळे जमाव झाला हिंसक : अफवांमुळे जमाव हिंसक झाला होता. आंदोलकांनी पोलिस व प्रशासकीय गाड्यांवर दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून महामार्ग मोकळा केला. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी मथुरेतील गोवर्धन मंदिरात दर्शन घेत आरतीमध्ये सहभाग घेतला.
Web Summary : Cow vigilante 'Farsawale Baba' died suspiciously near Mathura, sparking mob violence. Supporters allege murder by cow smugglers, while officials cite a traffic accident due to fog. The crowd turned violent due to rumors, leading to police intervention.
Web Summary : मथुरा में 'फरसावाले बाबा' नामक गोरक्षक की संदिग्ध परिस्थितियों में मौत हो गई, जिससे हिंसा भड़क उठी। समर्थकों ने गो-तस्करों द्वारा हत्या का आरोप लगाया, जबकि अधिकारियों ने कोहरे के कारण सड़क दुर्घटना बताई। अफवाहों से भीड़ हिंसक हो गई, जिसके बाद पुलिस ने हस्तक्षेप किया।