आयएएस अधिकाऱ्याचा बंगळुरुत संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: March 18, 2015 00:16 IST2015-03-18T00:16:42+5:302015-03-18T00:16:42+5:30

कर्तव्यदक्ष युवा आयएएस अधिकारी बेंगळुरू येथील अतिरिक्त वाणिज्य कर आयुक्त डी.के. रवी यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत सीबीआय चौकशीची मागणी करीत निदर्शक मंगळवारी रस्त्यावर उतरले.

Suspicious death of IAS officer in Bangalore | आयएएस अधिकाऱ्याचा बंगळुरुत संशयास्पद मृत्यू

आयएएस अधिकाऱ्याचा बंगळुरुत संशयास्पद मृत्यू

बेंगळुरू/ कोलार : कर्तव्यदक्ष युवा आयएएस अधिकारी बेंगळुरू येथील अतिरिक्त वाणिज्य कर आयुक्त डी.के. रवी यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत सीबीआय चौकशीची मागणी करीत निदर्शक मंगळवारी रस्त्यावर उतरले. कोलार जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला असता दगडफेकीच्या तुरळक घटनाही घडल्या.
दरम्यान, विरोधकांनी कर्नाटक विधानसभेतही या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली.
२००९ च्या कर्नाटक तुकडीतील अधिकारी असलेले ३५ वर्षीय रवी हे कोलार जिल्ह्यात उपआयुक्त असताना त्यांनी जमीन आणि वाळूमाफियांवर केलेली कारवाई गाजली होती.
त्यानंतर काही दिवसांतच वाळूमाफियांच्या दबावामुळे रवी यांची बेंगळुरू येथे बदली करण्यात आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी जोरदार विरोध केला होता. (वृत्तसंस्था)


संशयास्पद मृत्यू
डी.के. रवी हे सोमवारी सकाळी कार्यालयातून घरी परतल्यानंतर त्यांच्या सरकारी सदनिकेत त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. त्यांच्या घरी आत्महत्येचे कारण सांगणारी कोणतीही चिठ्ठी सापडली नसली तरी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करीत चौकशी चालविली आहे. न्यायवैद्यक, वैद्यकीय चाचणी आणि परिस्थितीजन्य सर्व पैलू पाहता सकृद्दर्शनी आत्महत्या असल्याचे दिसून येते, असा दावा बेंगळुरूचे पोलीस आयुक्त एम.एन. रेड्डी यांनी केला आहे.

परिस्थिती हाताळणे
राज्याच्या हाती- रिजिजू
आयएएस अधिकारी डी.के. रवी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळणे सर्वस्वी कर्नाटक सरकारची जबाबदारी असून त्यात केंद्राची कोणतीही भूमिका नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. अधिकाऱ्यांचा थेट संबंध राज्याशी असल्यामुळे केंद्राला राज्य सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करणे अवघड ठरते. हा मुद्दा गंभीर असून मंगळवारी संसदेतही तो उपस्थित झाला आहे. मी काही बोललो असतो तर केंद्राचा अनावश्यक हस्तक्षेप मानला गेला असता. त्यामुळे मी राज्याकडून उत्तर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Suspicious death of IAS officer in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.