दंगलीच्या गुन्ातील संशयितास जामीन
By admin | Updated: April 5, 2016 00:15 IST
जळगाव : कन्नड घाटातील रिपीटर पॉइंटवर १७ मार्च रोजी झालेल्या दंगलीतील संशयित आरोपी विकारखान मुख्तारखान याला न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी व शर्थींसह जामीन मंजूर केला.
दंगलीच्या गुन्ातील संशयितास जामीन
जळगाव : कन्नड घाटातील रिपीटर पॉइंटवर १७ मार्च रोजी झालेल्या दंगलीतील संशयित आरोपी विकारखान मुख्तारखान याला न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी व शर्थींसह जामीन मंजूर केला.घाटात केलेल्या बॅरिकेटींगजवळ वाहन अडवल्यानंतर विकारखानसह त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला करत शासकीय कामात अडथळा आणला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३०७, ३३२, ४२७ नुसार गुन्हा दाखल आहे. विकारखानला न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड.सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.