शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्क-दिल्ली विमानात सहप्रवाशावरच लघुशंका; भारतीय प्रवाशाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 13:13 IST

भारतीय प्रवाशाला केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाने न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एका भारतीयाला त्याच्या सहप्रवाशावर लघुशंका केल्याच्या आरोपाखाली येथील विमानतळावर अटक करण्यात आली आहे. 

या भारतीय प्रवाशाने मद्यप्राशन केले होते, असे एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. सहप्रवाशासोबत झालेल्या वादानंतर या प्रवाशाने लघुशंका केली. अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट एए २९२ मध्ये ही घटना घडली. रविवारी रात्री ९ च्या सुमारास हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने या प्रवाशाला पकडले. पीडित प्रवाशाने एअरलाइन्सकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.  मद्यप्राशन केल्यानंतर प्रवाशांनी सहप्रवाशांवर कथितपणे लघुशंका केल्याच्या घटना अलीकडच्या काळात नोंदल्या गेल्या आहेत. 

गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या बिझिनेस क्लासमध्ये अशीच घटना घडली होती. अशी दुसरी घटना ६ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या पॅरिस-नवी दिल्ली विमानात घडली होती.  

टॅग्स :Americaअमेरिकाairplaneविमान