शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात डान्स करणा-या 'त्या' पोलीस कर्मचा-याचं निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 09:06 IST

पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सधन मोंडल यांचा पोलीस ठाण्यात डान्स करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबनसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सधन मोंडल यांचा पोलीस ठाण्यात डान्स करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होताज्या पोलीस कर्मचा-याने या व्हिडीओचं रेकॉर्डिंग करुन, ऑनलाइन अपलोड केला त्याचंही निलंबन करण्यात आलं आहे

कोलकाता- पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सधन मोंडल यांचा पोलीस ठाण्यात डान्स करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एखाद्या पार्टीत नाचत असल्याप्रमाणे ते पोलीस ठाण्यात डान्स करत होते. यावेळी दुसरा पोलीस कर्मचारी व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असताना, तिथे उपस्थित महिला पोलीस कर्मचारी टाळ्या वाचून कौतुक करत होत्या. विशेष म्हणजे, कारागृहात बंद कैद्यांसमोरच हा सगळा प्रकार सुरु होता. 

सधन मोंडल यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठांनी कारवाई करत त्यांचं निलंबन केलं आहे. यासोबत ज्या पोलीस कर्मचा-याने या व्हिडीओचं रेकॉर्डिंग करुन, ऑनलाइन अपलोड केला त्याचंही निलंबन करण्यात आलं आहे. निलंबन करण्यात आलेले पोलीस कर्मचारी आसनसोल येथील हिरापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 

याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचा आदेश दिला आहे. निलंबित पोलीस कर्मचा-यांना स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं आहे. यासोबतच जेव्हा हा डान्स सुरु होता तेव्हा बाहेरील अन्य कोणी उपस्थित होतं का ? याचाही तपास सुरु आहे. 

नेमका काय प्रकार ?पोलीस स्टेशनमध्ये बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करतानाचा एका पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. एक पोलीस कर्मचारी बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसत होता. तर दुसरा पोलीस त्या नाचणाऱ्या पोलिसाचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. नाचणा-या पोलीस कर्मचा-याचं नाव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सधन मोंडल असं आहे. 

व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी ड्युटीवर असताना बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करतो आहे. तर पोलीस स्टेशनमधील काही महिला अधिकारी टाळ्या वाजवताना व हसताना दिसत आहे. एक मिनिटांची ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.   

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे