सभापतींवरील अविश्वास ठरावास खंडपीठाची स्थगिती

By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:13+5:302015-06-25T23:51:13+5:30

पाथर्डी : पंचायत समितीच्या सभापती उषाताई अकोलकर यांच्या विरोधात सहा सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर गुरुवारी विशेष सभा बोलावण्यात आली होती, परंतु या विशेष सभेला औरंगाबाद खंडपीठाने चार आठवड्यांची स्थगिती दिल्याने अकोलकर यांना तूर्तास तरी जीवदान मिळाले आहे.

Suspension of non-confidence motion bench of the Speaker | सभापतींवरील अविश्वास ठरावास खंडपीठाची स्थगिती

सभापतींवरील अविश्वास ठरावास खंडपीठाची स्थगिती

थर्डी : पंचायत समितीच्या सभापती उषाताई अकोलकर यांच्या विरोधात सहा सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर गुरुवारी विशेष सभा बोलावण्यात आली होती, परंतु या विशेष सभेला औरंगाबाद खंडपीठाने चार आठवड्यांची स्थगिती दिल्याने अकोलकर यांना तूर्तास तरी जीवदान मिळाले आहे.
सभापती उषाताई अकोलकर यांचे विरोधात सहा सदस्यांनी १८ जून रोजी सभा घेत अविश्वास ठराव पारीत करीत त्याचा प्रस्ताव दुसर्‍या दिवशी १९ जून रोजी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचेकडे सादर केला.त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी विशेष सभेचा अजेंडा काढीत २५ जून रोजी विशेष सभेचे आयोजन पंचायत समिती सभागृहात केले.या सभेचे कामकाज प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी पहावे असे आदेश दिलेे.मात्र पंचायत समितीची विशेष सभा बोलावण्यासाठी दहा दिवसांची मुदत देणे आवश्यक असताना जिल्हाधिकार्‍यांनी आठ दिवसातच विशेष सभा बोलावल्याने या आदेशाला स्थगिती मिळावी, अशी याचिका उषाताई अकोलकर यांनी खंडपीठात दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी खंडपीठाने हा स्थगिती आदेश दिला.अकोलकर यांनी ॲड.प्रशांत नांगरे यांचेमार्फत खंडपीठात राज्याचे मुख्य सचिव ,जिल्हाधिकारी ,प्रांताधिकारी व अविश्वास ठराव दाखल करणार्‍या सहा सदस्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.पं.स.अधिनियमाप्रमाणे सर्वसाधारण सभा बोलावयाची असेल तर सदस्यांना सात दिवसांची तर विशेष सभा बोलावयाची असेल तर दहा दिवसांची मुदत देणे बंधनकारक असताना जिल्हाधिकार्‍यांनी सातच दिवसात ही सभा बोलावून सदस्यांचा हक्क हिरावून घेतल्याचा मुद्दा नांगरे यांनी मांडल्यानंतर न्यायमूर्ती सुनील देशमुख यांनी या सभेला चार आठवड्यांची स्थगिती देत पुढील सुनावणी २२ जुलै रोजी ठेवली आहे. (तालुका प्रतिनिधी)
.......

पंचायत समितीच्या नवीन वास्तुचे उदघाटन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्याचे आपले स्वप्न होते. ते येत्या एक महिन्यात पूर्ण करण्यासाठी खंडपीठात धाव घेतली. आता ते स्वप्न पूर्ण होणार.
-उषाताई अकोलकर, सभापती.
...
न्यायालयाने एक महिन्यानंतर ठेवलेली सुनावणी अगोदर घ्यावी, अशी फेरयाचिका आम्ही खंडपीठात दाखल करणार आहोत.
-देवीदास खेडकर, पंचायत समिती सदस्य.
....

Web Title: Suspension of non-confidence motion bench of the Speaker