आपने वचन पाळले कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीला स्थगिती
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:58+5:302015-02-18T00:12:58+5:30
नवी दिल्ली- दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या (आप) सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाची पूर्तता करीत कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीतून काढून टाकण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले आहेत. या निर्णयामुळे सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

आपने वचन पाळले कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीला स्थगिती
न ी दिल्ली- दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या (आप) सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाची पूर्तता करीत कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीतून काढून टाकण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले आहेत. या निर्णयामुळे सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत उपरोक्त निर्णय झाला. दिल्ली सरकारचे विविध विभाग आणि संस्थांद्वारे कंत्राटावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये डॉक्टर्स, परिचारिका, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह सुमारे एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील आदेशापर्यंत कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्याची सेवा बडतर्फ अथवा थांबविण्यात येऊ नये,असे शासनातर्फे विविध विभागांसाठी जारी करण्यात आलेल्या संक्षिप्त आदेशात नमूद करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे कंत्राट संपायला आले आहे त्यांनाही या आदेशाचा फायदा होणार असून त्यांना त्यांची सेवा पुढे सुरू ठेवण्याची परवानगी मिळणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत एक निश्चित धोरण ठरविण्याकरिता या मुद्याचा सखोल आढावा घेण्याची प्रक्रिया दिल्ली सरकारने सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बालकल्याण आदी शासकीय विभागांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेतले जाईल,असे आश्वासन आपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. (वृत्तसंस्था)