निलंबन/ सुमित्रा महाजन स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच कारवाई- महाजन

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30

स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच निलंबनाची कठोर कारवाई करावी लागली. आसनासमोर येऊन फलक दाखविणे चुकीचे आणि नियमांविरुद्ध आहे. चुकीची धारणा संपवायला हवी. मी सोमवारी सकाळीही तो प्रयत्न केला. गेल्या आठ दिवसांपासून सभागृहात फलके दाखवू नका, असे बजावत आहे. काँग्रेसच्या खासदारांनी मंत्र्यासमोर आणि अध्यक्षांसमोर फलक धरत त्यांचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करीत सीमा ओलांडली होती. कठोर कारवाई करण्याची इच्छा नव्हती. तो माझा स्वभाव नाही, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे ते करावे लागले. लोकशाहीत विरोधी पक्षाला स्थान असते. त्यांना बाजू मांडण्याचा अधिकार असतो; मात्र सर्व नियमांना धरून केले जाते. मी चांगल्यारीतीने काम चालविण्याचा प्रयत्न केला, असे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन संसद भवनात प्रतिक्रिया देताना म्हणाल्या.

Suspension / action due to Sumitra Mahajan's status quitting - Mahajan | निलंबन/ सुमित्रा महाजन स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच कारवाई- महाजन

निलंबन/ सुमित्रा महाजन स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच कारवाई- महाजन

थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच निलंबनाची कठोर कारवाई करावी लागली. आसनासमोर येऊन फलक दाखविणे चुकीचे आणि नियमांविरुद्ध आहे. चुकीची धारणा संपवायला हवी. मी सोमवारी सकाळीही तो प्रयत्न केला. गेल्या आठ दिवसांपासून सभागृहात फलके दाखवू नका, असे बजावत आहे. काँग्रेसच्या खासदारांनी मंत्र्यासमोर आणि अध्यक्षांसमोर फलक धरत त्यांचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करीत सीमा ओलांडली होती. कठोर कारवाई करण्याची इच्छा नव्हती. तो माझा स्वभाव नाही, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे ते करावे लागले. लोकशाहीत विरोधी पक्षाला स्थान असते. त्यांना बाजू मांडण्याचा अधिकार असतो; मात्र सर्व नियमांना धरून केले जाते. मी चांगल्यारीतीने काम चालविण्याचा प्रयत्न केला, असे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन संसद भवनात प्रतिक्रिया देताना म्हणाल्या.

Web Title: Suspension / action due to Sumitra Mahajan's status quitting - Mahajan