फेसबुकवर बलात्काराचा व्हिडिओ अपलोड करणारा अटकेत
By Admin | Updated: July 13, 2016 17:43 IST2016-07-13T17:43:24+5:302016-07-13T17:43:24+5:30
एका तरुणीवर बलात्कार करुन तिचा व्हिडिओ फेसबुक या संकेतस्थळावर अपलोड केल्याप्रकरणी बलियामधील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

फेसबुकवर बलात्काराचा व्हिडिओ अपलोड करणारा अटकेत
>ऑनलाइन लोकमत
उत्तरप्रदेश, दि. १३ - एका तरुणीवर बलात्कार करुन तिचा व्हिडिओ फेसबुक या संकेतस्थळावर अपलोड केल्याप्रकरणी बलियामधील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
नौशाद असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर एक हॉटेलमध्ये बलात्कार केला. यावेळी त्याने एक व्हिडिओ सुद्धा तयार केला. तसेच, या व्हिडिओची क्लिप तिला दाखून तिचा छळ करत होता. गेल्या काही दिवसात नौशादने तिला एका हॉटेलमध्ये बोलविले होते. त्यावेळी ती गेली नसल्याने त्याने संबंधित व्हिडिओची क्लिप फेसबुकवर अपलोड केली.
यासंदर्भात तरुणीच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नौशाद याला अटक केली आहे.