लादेनचे आधार कार्ड बनवू पाहणारा अटकेत
By Admin | Updated: May 16, 2017 01:48 IST2017-05-16T01:48:11+5:302017-05-16T01:48:11+5:30
राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या नावाने आधार कार्ड बनविण्याचा प्रयत्न

लादेनचे आधार कार्ड बनवू पाहणारा अटकेत
जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या नावाने आधार कार्ड बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आधार केंद्र चालकाला अटक करण्यात आली आहे. सद्दाम हुसैन मन्सुरी (२५) असे त्याचे नाव आहे.
मन्सुरीला अटक करण्यात आली आहे, असे भिलवाडाचे पोलीस अधीक्षक प्रदीप मोहन शर्मा यांनी सांगितले. तो लादेनचे आधार कार्ड बनवू पाहत होता. त्यासाठी त्याने लादेनचे अस्पष्ट छायाचित्र आणि त्याची माहिती आपल्या केंद्रावरून आधार पोर्टलवर अपलोड केली होती. पठ्ठ्याने आधार अर्जात लादेनचा पत्ता अबोटाबाद, भिलवाडा असा टाकला होता. तथापि, युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (यूआयडीएआय) अधिकाऱ्यांना अर्जात अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी पाठविण्यात आले होते. चौकशीत मन्सुरीच्या प्रयत्नाचा पर्दाफाश झाला.